(संगमेश्वर)
जमातुल मुस्लिमीन घाटीवळे कमिटीचे गाळा फोडून त्यातील सार्वजनिक जेवणाचे तांब्याचे ७ डेग पळवून नेल्याची घटना तालुक्यातील घाटीवळे मुस्लीमवाडी येथे घडली आहे.
ही घटना २२ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद नाजिम लतिफ फोडकर (४५, घाटीवळे, मुस्लीमवाडी, संगमेश्वर) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात दिली. ध्यानुसार अज्ञातावर भादविकलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.