(संगमेश्वर)
देवरूख-करंबेळे (ता. संगमेश्वर) येथील धरण क्षेत्रात मृतावस्थेत गवा आढळला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालानंतर पुढे आली. वन विभागाकडून नियमानुसार पुढील प्रक्रिया करण्यात आली.
करंबेळे येथील धरण क्षेत्रात गवा मृतावस्थेत असल्याची माहिती पोलिस पाटील श्री. खाके यांनी दूरध्वनीद्वारे वन विभागाला दिली. वन अधिकाऱ्यांसह वनपाल संगमेश्वर व अन्य कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. देवरुखचे पशुवैद्यकीय अधिकारी श्री. कदम यांनीही मृत गव्याची तपासणी केली. त्याच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती. मृत्यूचे कारण समजून घेण्यासाठी गव्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये गव्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे पुढे आले. विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार तपास करत आहेत.
फाईल फोटो