(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर ओझरखोल येथे सकाळी ट्रकला अपघात झाला. रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने जात असताना ट्रक चालकाला झोप अनावर झाल्याने ट्रक विरुद्ध दिशेला जाऊन कातळ मध्ये धडकला. अपघात होताना ट्रक चालकाने क्लिनरच्या बाजूच्या सीटवर उडी घेतल्याने सुदैवाने बचावला. अन्यथा जीवितहानी झाली असती. हा ट्रक रस्त्याच्या मधोमध असल्याने एका बाजूने वाहतूक सुरू आहे.