(रत्नागिरी)
संगमेश्वर तालुक्यातील साडवली कासारवाडी येथे संबंधाच्या संशयातून तरूणाला जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात केल्याची घटना घडली होती. या मारहाणीत तरूणाच्या गुप्तांगाला गंभीर दुखापत झाली असून रत्नागिरी शहरातील खासगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल़ी. दरम्यान जखमी तरूणाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले असून देवरूख पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांविरूद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल़ा. राजकुमार डोंगरे, शुभम धने, निखिल मोहिरे, श्रेयस मोहिरे (ऱा. सर्व साडवली त़ा संगमेश्वर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़.
देवरूख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 31 वर्षीय तरूण हा नवबौद्ध समाजातील असून देवरूख शिक्षक कॉलनी येथील रहिवासी आह़े. 4 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 7.30च्या सुमारास तो साडवली बौद्धवाडी येथे राहणाऱ्या मित्राच्या घरी जात होत़ा. कासारवाडी रस्त्याने चालत जात असताना एका इसमाने पीडित तरूणाला अडवल़े. यावेळी अनोळखी असणाऱ्या या इसमाने संशयित आरोपींना बोलावून घेतल़े. तू इथे कशासाठी येतोस, ते आम्हांला माहिती आह़े.
नाजूक संबंधांच्या संशयातून आरोपी राजकुमार डोंगरे, शुभम धने, निखिल मोहिरे व श्रेयस मोहिरे यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल़ी. तसेच यानंतर संशयित आरोपी हे पीडित तरूणाला एका माळावर घेवून गेल़े. त्या ठिकाणी तरूणाच्या गुप्तांगावर, पोटावर लाथा मारल्य़ा तसेच डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी तक्रार पीडित तरूणाने देवरूख पोलिसांत दाखल केल़ी.
आरोपी यांनी पीडित तरूणाच्या भावाला बोलावून घेत त्याला कुटुंबियांकडे देण्यात आल़े. घरी आल्यानंतर पीडित तरूणाच्या गुप्तांगाला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आल़े. त्यानुसार नातेवाईकांनी त्याला रत्नागिरीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े.
यावेळी गुप्तांगाला गंभीर दुखापत झाल्याने तातडीने ऑपरेशन करण्याचे डॉक्टरांनी सांगितल़े. त्यानुसार या तरूणाच्या गुप्तांगाचे ऑपरेशन करण्यात आल़े. पीडित तरूणाने दाखल केलेल्या तकारीनुसार, देवरूख पोलिसांनी संशयिताविरूद्ध भादंवि कलम 307, 325, 323, 143, 149, 504, 506 व अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ाआहे.