(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे येथे सलूनच्या पाठीमागील बाजूस बेकायदा तीन पानी जुगार खेळणाऱ्या दोघांना पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३४ हजार २७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शैलेश अशोक सार्दळ ( ४२ , देवरुख सोळजाई मंदिर शेजारी ), अक्षय दीपक नटे ( २५ , हरपुडे , सुतारवाडी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अनिकेत चव्हाण यांनी पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश सार्दळ व अक्षय नटे हे दोघे पैसे लावून तीन पानी जुगार खेळ खेळत होते. पोलिसांना याची माहिती मिळताच या ठिकाणी जावून धाड टाकण्यात आली. दोघांकडे २४ हजार २४ हजार २६० रुपये रोख रक्कम व ५ हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण ३४ हजार २७६ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलीसानी दोघांनाही ताब्यात घेतले असून महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ ( अ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.