( संगमेश्वर )
जवळच्या एका गावातील अल्पवयीन मुलीला सोशल मिडियाचा वापर करीत पळवून घेऊन जाणाऱ्या आरोपीला संगमेश्वर पोलिसांनी वसई येथे अटक केली आहे.
अल्पवयीन मुलीला पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आदेश दिल्यानंतर २ महिने वेगवेगळी ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी सुमित संजय लोध (रा. डोंबिवली, जिल्हा ठाणे) याला संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सचिन कामेरकर, पंदेरे, टेरवणकर यांनी मिरा भाईंदर, ठाणे येथे अटक केली. संगमेश्वरजवळच्या एका गावातील अल्पवयीन मुलीला सुमित लोध याने फूस लावून पलायन केले होते. याबाबत संगमेश्वर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलीस तपास करत होते.