(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील चाफवलीच्या ललिता कांबळे या आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आमरण उपोषणाला बसल्या आहेत. तसेच सुरेंद्र गोपाळ कांबळे हे देखील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपोषणाला बसले आहेत. आपल्यावर झालेल्या अन्यायाचे पत्र त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते. मात्र योग्य ती कारवाई न झाल्याने त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
ललिता कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे, गावाचे पोलिस पाटील विजय चाळके यांनी देवळे गावात येऊन जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप केला आहे. २२ नोव्हेंबर २०२१ रोजी घडल्या या प्रकाराची तक्रार पोलिस स्थानकात दिली होती. पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेतल्यामुळे कांबळे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता.
तर दुसऱ्या प्रकरणात संतोष पितळे यांनी म्हंटले आहे की, गावातील १४ जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केला. याचे आरोप माजी ग्रामपंचायत सदस्य , दागोले पितळेवाडी यांच्यावर केला आहे. २२ मे २०२० रोजी रात्री घडलेल्या घटनेप्रकरणी देवरूख पोलिसांनी केलेली कारवाई योग्य नसल्याचा आरोप संतोष पितळे यांनी केला आहे .