(चिपळूण /ओंकार रेळेकर )
सुयश पाष्टे यांनी चिपळूणवासीयांसाठी आज पासून एक नवे शैक्षणिक दालन येथे सुरू केले आहे. याचा आम्हाला अभिमान आहे चिपळूण मधील विद्यार्थ्यांना श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्या यशाचा मार्ग येथून मिळणार आहे. शैक्षणिक जीवनात मुलांना याचा फार मोठा उपयोग होणार असून सुयश पाष्टे यांनी पूर्ण पणे मेहनत घेऊन २०१६ पासून अल्पावधीतच आपल्या संस्थेचे नाव उज्वल केले आहे. त्यांचा शैक्षणिक दृष्टिकोन निश्चितच विद्यार्थ्यांसाठी यशाचा खरा मार्ग बनेल असा विश्वास उद्योजक चंद्रकांत भोजने यांनी व्यक्त केला.
बुधवारी गुढीपाडव्याचे औचित्य साधून श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इन्स्टिट्यूटच्या नवीन शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी मोफत करिअर मार्गदर्शन संपन्न झाले. उद्योजक चंद्रकांत भोजने यांच्या हस्ते फित कापून शाखेचे उदघाटन झाले. तर अँड.अमोल भोजने यांच्या हस्ते क्लासरूमचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी समर्थ कृपा क्लासेसचे विद्यार्थी नावलौकिक करतील, असा विश्वास उद्योजक व इंडियन सायंटिफिक सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत भोजने यांनी या वेळी येथे बोलतांना व्यक्त केला.
प्रमुख पाहुणे, मार्गदर्शक माधव अकलंगे यांनी विद्यार्थ्यांना जेईई, नीट क्लासेसचे महत्व सांगताना विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे आपले उद्दिष्ट ठेऊन काय गुण आत्मसात केले पाहिजेत याबाबत मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष सुयश पाष्टे यांच्या हस्ते कोकणातील प्रतिथयश व्यावसायिक चंद्रकांत भोजने,माधव अकलंगे, जयंत खताते, संचालक सौ.पूजा शुभम खताते, सौ.स्नेहा महाडिक, ॲड. अमोल भोजने आदी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास विद्यालयातील विद्यार्थी, पालक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या शिबिरात शिक्षण तज्ञांकडून पाल्य व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक आणि समर्थ कृपा इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ प्रोफेसर नारायण सिंग, वीरेंद्र कुमार सिंग, शिवचंद्र पाठक, क्रिश पाठक यांनी दहावी- बारावी नंतर काय ? यासंबंधी विविध पैलूंबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थी पालक व तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्यामध्ये संवाद साधून विद्यार्थी व पालक यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुयश पाष्टे, श्री समर्थ कृपा प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस. अली, संस्थेचे चेअरमन उदय शेट्ये, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, पर्यवेक्षक ए. एच. घोसाळकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. मेघा साळुंखे व कु. कोमल भोसले यांनी केले.उद्योजक चंद्रकांत भोजने ,चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तालुकाध्यक्ष जयद्रथ खताते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष मिलिंद कापडी , संचालक अँड. अमोल चंद्रकांत भोजने .एसीबी इंटरनॅशनल स्कूल संचालिका पूजा खताते, एसीबी इंटरनॅशनल स्कूलच्या गुणवत्ता अधिकारी सौ.नेहा महाडिक, मुख्याध्यापक राकेश भुरण ,पर्यवेक्षक मुकुंद ठसाळे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री समर्थ कृपा इन्स्टिट्यूटच्या शिक्षक,कर्मचारी वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.
फोटो : श्री समर्थ कृपा इन्स्टिट्यूटच्या जेईई, नीट, क्लासेसच्या शुभारंभ प्रसंगी उद्घाटक चंद्रकांत भोजने यांचे स्वागत करताना चेअरमन सुयश पाष्टे यांच्यासह जयंद्रथ खताते, माधव अंकलगे, मिलिंद कापडी छायाचित्रात दिसत आहेत
(छाया : ओंकार रेळेकर)