( खेड/इक्बाल जमादार )
सकल नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांची 722 वी जयंती दापोली तालुका नाभिक समाज संघटनेच्या वतीने पेन्शनस हॉल दापोली येथे विविध कार्यक्रम साजरे करून उत्साहाच्या व भक्तिमय वातावरणात पार पडली. या निमित्ताने सकाळी श्री संत सेना महाराज यांची प्रतिमा पूजन व आरती करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते श्री संदेश चव्हाण गुरुजी यांनी श्री संत सेना महाराजांच्या जीवनावर व्याख्यान दिले. तर असोंड येथील नामांकित भजन सम्राट श्री राजाराम यादव यांनी सुस्वर भजन साजरे केले. कुमार मिहीर चव्हाण या विद्यार्थ्याने शिवा काशीद यांच्या जीवनावर पहाडी आवाजात भाषण करून सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नाभिक समाजातील मान्यवरांचा यथोचित गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक यांना शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन समाजाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, यावेळी हळदी-कुंकू कार्यक्रमही उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर नाभिक समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष पत्रकार श्री मंगेश शिंदे, उत्सव कमिटी अध्यक्ष श्री संतोष शिंदे, सुभेदार श्री विनोद यादव, सचिव श्री शैलेश चव्हाण, खजिनदार प्रीतम शिंदे, माजी अध्यक्ष मारुती चव्हाण, उदय शिंदे, शेखर कदम, वाकवली उन्हवरे गटाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, पालगड गट अध्यक्ष राजू चव्हाण, खेर्डी गट अध्यक्ष मंगेश कदम, कादिवली गट अध्यक्ष संदीप गायकवाड, जालगाव गट अध्यक्ष विलास यादव, दापोली शहर अध्यक्ष गुरुदास सवनसकर,सतीश चव्हाण, अनिल पवार,रणजित कदम, मनोज कदम, उदय चव्हाण,नितीन यादव, राजेंद्र यादव, सचिन शिंदे, अभिजित सरनोबत, सुहास चव्हाण, बंटी चव्हाण, प्रमोद जाधव, महेंद्र चव्हाण, विजय बागकर, अनिल कदम, शिरखल सरपंच सौ.संजीवनी गोंधलेकर, सौ.वैशाली चव्हाण, सोनल चव्हाण,रत्नाकर जाधव, सुनील चव्हाण, सौ.संजना चव्हाण, रमेश शिंदे, अक्षय शिंदे, अमित यादव, रुपेश शिंदे, बबलू शिंदे आदी तालुक्यातून बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते.
तालुक्यामध्ये प्रथमच श्रीसंत सेना महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने साजरा झाल्याने सर्व समाजबांधवांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.