( चिपळूण )
चिपळूण शहरातील ‘शौचालया’ तही गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतची तक्रार थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. सुमारे ७३ लाख रुपये खर्चाचे १ ते ५ शौचालयाचे कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार माजी नगरसेवक व सामजिक कार्यकर्ते इनायत मुकादम यांनी केली होती. या तक्रार अर्जाची दखल घेण्यात आली असून मुख्याधिकारी चिपळूण नगरपरिषद यांना तक्रार अर्जातील प्रत्येक मुद्यावर चौकशी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याबाबतचे आदेश मुख्याधिकारी चिपळूण नगरपरिषद यांना जिल्हा न.पा. प्रशासनाचे सहआयुक्त तुषार बाबर यांनी दिले आहेत.
या गैरव्यवहाराविषयी चौकशीचे आदेश प्राप्त झाल्याने पालिकेचे नगरअभियंता यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. या विषयी प्रतिक्रिया देताना इनायत मुकादम यांनी म्हटले की, आता मुख्याधिकारी यांनी निःपक्ष चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय यांना सादर केल्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी व नगरअभियंता न.पा.चे आर्थिक नुकसानीस जबाबदार व दोषी असल्याचे निश्चित सिद्ध होईल.