(रत्नागिरी)
शॉपिंग ॲपबाबत ऑनलाईन तक्रार करायला गेला आणि तरुणाला 82 हजार रुपयांचा फटका बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरूणाने रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केल़ी. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा कलमनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी शीपरॉकेट शॉपिंग ऍपबाबत तक्रार देण्यासाठी संबंधित मोबाईल नंबरवर कॉल केला होत़ा. यावेळी फोनवरून संभाषण करणाऱ्या समोरील व्यक्तीने रस्क डेस्क ऍप डाऊनलोड करण्यास सांगितल़े. तसेच या ऍपमध्ये गुगल पे चा पिन नंबर टाकण्यास सांगितल़ा. यानंतर ऍड अ नोटमध्ये जावून 1349 रिफंड माय गुगल पे असे टाईप करावयास सांगितल़े. यानंतर झीरो रूपीज ऑप्शनच्या येथे जावून 43692 असा कमांकावर टाईप करण्यास सांगून ही प्रोसेस तीनवेळा करण्यास सांगितल़ी.
तक्रारदार प्रोसेस करीत असताना त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यामधील 82 हजार रूपयांची रक्कम काढून घेण्यात आल़ी. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केल़ी. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.