( मुंबई / प्रतिनिधी )
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत सरकारने एक महत्वपूर्ण योजना आणली. वाढत्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी आणि शेतकरी शेतीच्या माध्यमातून कणखरपणे उभा रहावा यासाठी एक योजना आणण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतल्यास 90 टक्के हे सबसिडीच्या माध्यमातून कमी होणार आहे. आणि केवळ 10 टक्के कर्ज हे शेतकऱ्याला फेडाव लागणार आहे. एवढी मोठी योजना सरकारने प्रथमच आणली आहे.
शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा वापर करून कमी खर्चात चांगली पिके घेता यावी, यासाठी सरकारने ‘पीएम कुसुम योजना ‘ आणली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप बसविण्याची सुविधा केंद्र सरकार उपलब्ध करून देत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून मदत मिळते. जो शेतकरी सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून कर्ज घेईल त्याला 90 टक्के पर्यंत सबसिडी मिळणार आहे.
या योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना 60 टक्क्यांपर्यंत अनुदान देतं. त्याचबरोबर 30 टक्के लोक बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकतात. जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी सौरपंपाद्वारे शेतात सिंचन करू शकतील. ही योजना 2019 मध्ये सुरू झाली.
लाभ कसा घ्यायचा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या. india.gov.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही त्याचा ऑनलाइन फॉर्म भरू शकता. ऑनलाइन नोंदणी अर्ज भरल्यानंतर आधार कार्ड, जमिनीची कागदपत्रे, डिक्लरेशन फॉर्म, बँक खात्याचा तपशील आदी आवश्यक माहिती द्यावी लागणार आहे.