(गणपतीपुळे/वैभव पवार)
येत्या मंगळवारी असलेल्या अंगारकी चतुर्थीच्या यात्रेनिमित्त ना. उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासन, देवस्थान गणपतीपुळे आणि ग्रामपंचायत गणपतीपुळे यांची संयुक्त आढावा सभा आज रविवारी गणपतीपुळे ग्रामपंचायतीमध्ये घेतली. यानिमित्ताने विविध विभागांचा आढावा घेत सर्वसामान्य भक्तगणांना कसलाही त्रास होणार नाही व त्यांची कसलीही गैरसोय होणार नाही याबाबतीत अनेक सक्त सूचना ना. उदय सामंत यांनी दिल्या. त्यानंतर आजच्या वर्तमानपत्रात आलेल्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडल्याची केवळ बातमी वाचून तात्काळ सदर बैठकीला उपस्थित असणारे विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता यांना जाब विचारला. शासन निर्णय शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडायची नसतानाही सदर वीज कनेक्शन का तोडण्यात आली? असा सवाल केला. त्यावर संबंधित अधिकारी यांनी बेजबाबदार उत्तरे देऊन आंबा पीक हे शेती प्रकारात येत नसून ते हॉर्टीकल्चर प्रकारात येते, त्यामुळे शासनच्या नियमानुसारच आपण ते तोडल्याचे उत्तर दिले. त्यावर कोकणातील आंबा पीक हे शेती प्रकारात येत नाही हा जावईशोध कसा लावला? अशी विचारणा करत तात्काळ महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री नामदार नितीन राऊत यांच्या दूरध्वनीवरून निदर्शनास आणून देत ऊर्जामंत्री यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले आणि महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जामंत्री यांच्या माध्यमातून तोडलेली वीज कनेक्शन आजच्या आज जोडून देण्याचे आदेश दिले. तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत स्वतःचे विचार अंमलात न आणता शासनाची भूमिका बजवावी अशी समज दिली.
असा सुखद अनुभव आढावा बैठकीला उपस्थित असणारे अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आणि विविध पदाधिकारी तसेच गणपतीपुळे आणि मालगुंडवासीयांनी अनुभवला. एका वर्तमानपत्रात आलेल्या बातमीची तात्काळ दखल घेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीना. उदय सामंत यांनी केलेले प्रयत्न सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारे ठरले. राज्यभर पक्ष वाढीसाठी काम करतानाच आपल्या मंत्रालयीन विभागाचा कार्यभार सांभाळत शेतकरी, आंबा बागायतदार आणि आपल्या मतदारसंघाशी असणारी निष्ठा पुन्हा एकदा गणपतीपुळे आणि मालगुंडवासीयांनी अनुभवली. आमची बांधिलकी ही सर्वप्रथम सर्वसामान्य लोकांशी असल्याचे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून देत समस्त उपस्थित लोकांना दिलासा दिला.
कितीही अडचणी आल्या तरीही उदय सामंत यांचे आदराचे स्थान सर्वसामान्य लोकांच्या मनात कायम आहे. विधानसभेतील प्रत्येक घराघरांत त्यांनी आपले मानाचे स्थान निर्माण केले आहे. परिणामी सतत चार वेळा आमदार, मंत्री, पालकमंत्री, महामंडळाचे अध्यक्ष ही पदे ते सन्मानाने भूषवत असतात. हे सर्व करत असताना त्यांची लोकप्रियता कायम राहते, सोबतच सर्वसामान्य लोकांप्रती असणारी आपुलकी ही मनाचा ठाव घेते. त्यांचा सहकारी म्हणून मला त्यांचा खुप अभिमान वाटतो आणि पुन्हा – पुन्हा असे वाटते की, असे अभ्यासू नेतृत्व रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्राला लाभले हे मोठे भाग्य असून, नामदार उदय सामंत यांच्या कार्याला मनःपूर्वक सॅल्युट करावे तेवढे थोडेच असल्याचे उद्गार रत्नागिरी पंचायत समितीचे सदस्य गजानन ऊर्फ आबा पाटील यांनी काढले आहेत.