(संगलट-खेड / इक्बाल जमादार)
शिवसेना नेते रामदासभाई कदम हे बाळासाहेबांची शिवसेना अधिक मजबुत करण्याच्या दृष्टीने चांगलेच सक्रीय झाले असून लवकरच ते सुसेरी, पन्हाळजे, बहिरवली, खाडी पट्टयाचा दौरा करणार आहेत. रामदासभाईनी भेट द्यावी अशी या भागातील जून्या कार्यकर्त्याची गेल्या अनेक महिन्यापासून आग्रही मागणी असून त्याचा मान राखत या आग्रहाचा स्विकार करुन लवकरच ते खाडी पट्टाभागाचा दौरा करणार असल्याची माहिती शिवसेना तालुका सचिन धाडवे यांनी पत्रकराना दिली.
अनेक जुने जेष्ठ कार्यकर्ते हे रामदासभाईंना त्यांच्या जामगे निवासस्थानी येऊन भेटत असतात. तर चिपळूण गुहागर, धामणंद, पंधरागाव तसेच लोटे परिसरातूनही अनेक सरपंच लोकप्रतिनिधी त्यांची भेट घेऊन आपल्या भागात दौरा करण्याची मागणी करीत आहेत. याबाबत जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण गुहागर मतदार संघ खेड तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण संघटक मनोज आंब्रे महिला आघाडी संघटक सुप्रिया पवार समन्वयक संजना कुडाळकर तालुका संघटक सान्वी आंब्रे युवासेना उपजिल्हाधिकारी सचिन काते, तालुका अधिकारी सुरज रेवणे व सहकारी संयुक्त दौरा करीत असून विभागातील आजी माजी पदाधिकारी, सरपंच शाखाप्रमुख रामदासभाईच्या दौ-याची तयारी करीत आहे.
रामदासभाईंच्या या दौ-याची खाडी पट्टयात जोरदार चर्चा असून जुन्या सहका-यामध्ये उत्साहाचे वातावरण असून लवकरच भाई लोटे, धामणंद, चिपळूण व गुहागरचा ही दौरा करणार असल्याची चर्चा आहे. रामदासभाईंच्या या झंझावती दौऱ्यामुळे उत्तर रत्नागिरी जिल्हयातील वातावरण ढवळून निघणार आहे. स्थानिकांना भाईच्या दौ-याची उत्सुकता लागून राहिली आहे.