(रत्नागिरी)
माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, महाबळेश्वर तालुका यांचे वतीने गटशिक्षणाधिकारी श्री आनंद पळसे यांचे हस्ते श्री रज्जाक हमीद मानकर यांचा सन्मान करणेत आला. सोमवार दि.२९ आँगस्ट रोजी महाबळेश्वर येथील नगरपालिका शिक्षण मंडळ कार्यालयात महाबळेश्वर तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभा गटशिक्षणाधिकारी श्री आनंद पळसे यांचे मार्गदर्शनात संपन्न झाली.
या सभेत द वेलफेअर एज्यु.सोसायटी कँम्प पुणे यांचे वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेबद्दल श्री रज्जाक हमीद मानकर यांचा महाबळेश्वर शिक्षण विभागाच्या वतीने सत्कार करणेत आला. सध्या रत्नागिरी येथे कार्यरत असलेले श्री मानकर हे महाबळेश्वरचे रहिवाशी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण हे महाबळेश्वर येथील नगरपालिका शाळा क्र १ येथे व माध्यमिक शिक्षण गिरिस्थान प्रशाला येथे झाले आहे.
इंग्रजी व शिक्षणशास्र या विषयातून एम.ए. डी.एड. बी.एड या पदव्या संपादन करणारे श्री मानकर हे सध्या पी.एच.डी. मिळविण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांचे हे कार्य संपूर्ण महाबळेश्वर शिक्षण विभागासाठी निश्चितच अभिमानास्पद व प्रेरणादायी आहे. याप्रसंगी आँनलाईन पद्धतीने संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकालही जाहीर करणेत येऊन यशस्वी शाळा व शिक्षकांचाही सन्मान गटशिक्षणाधिकारी सौ. यांचे हस्ते करणेत आला. याप्रसंगी सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.