(रत्नागिरी / प्रतिनिधी)
प्राथमिक शिक्षणाधिकारी वामन जगदाळे हे बुधवारी (ता. 31) सेवानिवृत्त झाले. त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहे. शिक्षणाधिकारी श्री. वामन जगदाळे यांचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना रत्नागिरी जिल्हाच्या वतीने बुधवारी (३१ मे २०२२ रोजी) सत्कार करण्यात आला.
नुकत्याच पार पडलेल्या केंद्र शासनाच्या असर’ या संस्थेच्या अहवालानुसार रत्नागिरी जिल्हा हा राज्यात अव्वल ठरला. त्याचबरोबर अंतराळ संशोधनाबाबत जिज्ञाना निर्माण व्हावी यासाठी नासा व इस्त्रो येथे गुणवत्ता विद्यार्थ्यांना नेण्यात आले. काही दिवसांपूर्वी या मुलांची अमेरिका वारी झाली. या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने देखील जगदाळे यांच्या कामाचे कौतूक केले.
जुनी पेन्शन संघटनेचे श्री. दत्तात्रय क्षिरसागर म्हणाले, जगदाळे यांच्या प्रशासकीय सेवेला प्रामाणिकतेची झालर आणि नाविन्याची कास तसेच ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला हा अधिकारी आहे. शिक्षक हा समाजातील सर्वात महत्वाचा घटक आहे. या घटकाच्या कल्याणासाठी काम करण्याची संधी जगदाळे यांना अनेकदा मिळाली. त्यांनी तत्काळ निर्णय घेऊन शासन निर्णयाची काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी केली. प्रामाणिक, सुसंवादी, सर्वांत मिसळण्याची त्यांची वृत्ती यामुळे प्रशासनात राहून, अनेक मंत्र्यांसोबत काम करूनही त्यांची प्रतिमा आदर्श घेण्याजोगी आहे.
या सत्कारावेळी जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा सरचिटणीस श्री.दत्तात्रय क्षिरसागर, रत्नागिरी तालुका प्रसिद्धीप्रमुख श्री.सुजित वाफेलकर, संघटनेचे सदस्य श्री.गणेश पडुळे, श्री.राहुल दुधाळे, श्री.प्रकाश खोडदे, श्री.कनावजे आदी उपस्थित होते.