(मुंबई)
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत माहिती दिली की, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) द्वारे 30,000 शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात येत असून ही प्रक्रिया एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच वर्षातून दोनदा TAIT परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) द्वारे शिक्षकांच्या ३० हजार रिक्त जागा भरल्या जात आहेत आणि एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यासाठी वर्षातून दोनदा टीएआयटी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली आहे.
प्रश्नोत्तराच्या तासावेळी उत्तर देताना केसरकर म्हणाले की, आयबीपीएस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोन खासगी एजन्सींना भरतीचे काम देण्यात आले आहे. या कंपन्या केंद्र सरकारसाठीही काम करतात आणि त्या विश्वासार्ह आहेत, असे ते म्हणाले. शिक्षक भरती प्रक्रिया एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून पुढील शैक्षणिक वर्षात हे शिक्षक रुजू होतील, असेही त्यांनी सांगितले.
शिक्षण विभागाकडून २०१२ पासून पूर्ण क्षमेतेने शिक्षक भरती झालेली नाही. राज्यातील शाळांमध्ये शिक्षक नाहीत. काहीजण निवृत्त झाले आहेत. शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा बोजा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने शिक्षक भरती प्रक्रिया वेगाने सुरु केली आहे, असे ते म्हणाले.