(मुंबई)
शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांची तब्बल ७ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याचे उघडीस आल्यावर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रताप सरनाईक यांची घोडबंदर येथील एका जमीनीच्या व्यवहारात ही फसवणूक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जमीन खरेदी करण्यासाठी त्यांनी एका व्यक्तील संपर्क केला होता. मार्टीन बर्नार्डो, कोरिया असे या व्यक्तीचे नाव आहे.
प्रताप सरनाईक यांनी जमीनीच्या व्यवहारासाठी पहिल्या टप्प्यात साडेतीन कोटी रूपये दिले. मात्र त्या व्यक्तीने जमीन नावावर केली नाहीच, सोबतच पैसे देखील परत केले नाहीत अशी माहिती मिळत आहे.
२०२१ पासून या व्यवहारासाठी प्रताप सरनाईक प्रयत्न करत आहेत. संबंधीत आरोपीने टाळाटाळ केली. यानंतर सरनाईक यांनी अखेर पोलिसांत तक्रार दिली. आरोपीवर फसवणूक संबंधीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील या प्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे.