(जाकादेवी/ वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य कला संचालनालय मुंबई यांच्यामार्फत एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय एलिमेंट्री व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमध्ये बळीराम परकर विद्यालय मालगुंड मधल्या ९५ विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादित करून शाळेच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
बळीराम परकर विद्यालय मालगुंड या शाळेतून एलिमेंटरी ग्रेड परीक्षा ५० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये ए श्रेणीमध्ये सेजल धावडे, हर्षदा हळदणकर तसेच बी श्रेणीमध्ये अस्मिता दळवी, सोहम डांगे, हेरंब डोरलेकर, प्रांजल गोनबरे, मानस हेदवकर, सविता मांजरेकर, गौरी नेवरेकर, भूमी पोवार, धनश्री सावंत, गौरी सुर्वे बाकी सर्व विद्यार्थी C श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेमध्ये ४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले. निकाल शंभर टक्के लागला.
ए श्रेणीमध्ये नेहा चौगुले, साक्षी डांगे, यश कोलगे, दिग्विजय लाड, आर्या लोगडे, समृद्धी लोगडे, गौरी मालप, प्रणव माने, अथर्व म्हादये, सेजल मयेकर, सानिया पाटील, तनवी पात्ये, रोहिणी साळवी, रेवती शितप, सानिया शितप, मनीष वेद्रे, अजिंक्य कळंबटे,अनुज खेऊर तसेच बी श्रेणीमध्ये ईश्वरी भोसले, प्रसाद भुते, संस्कार भुते, सोहम भुते, प्रिया दुर्गवळी, गायत्री घवाळी, स्वस्तिक घवाळी, सारिका गोणबरे, वेदिका गोताड, दीप्ती कळंबटे, विघ्नेश खेऊर, रिष्ठा मटकर, रितेश पाताडे, राज पात्ये, अनुष्का रामगडे, भार्वी साळवी, श्रद्धा सावंत, श्रेया सावंत उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व उत्तीर्ण व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशालेतील उपक्रमशील कलाशिक्षक शाम पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक कलाध्यापक यांचे शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर संस्थेचे, सचिव आणि मालगुंड विद्यालयाचे सी.ई.ओ. विनायक राऊत, प्रशालेचे मुख्याध्यापक इ.एस.पाटील यांनी अभिनंदन केले.