प्रत्येक व्यक्तीच्या विशेषत: मुलांच्या योग्य शारीरिक आणि मानसिक विकासासाठी निरोगी पोषण ही सर्वात मोठी गरज असून, अशा परिस्थितीत लोकांना संतुलित आणि पौष्टिक आहाराचे फायदे आणि गरजेबद्दल, निरोगी, तंदुरुस्त राहण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहाराचा अवलंब करण्यासाठी केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे एक ते सात सप्टेंबर या कालावधीत. “प्रधानमंत्री राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहांत” केला जातो. याला अनुसरून जिल्हा परिषद शाळा गोळी टप्पा तालुका संगमेश्वर या शाळेत या सप्ताहाचे महत्व व त्याची जनजागृती व्हावी अशा उदात्त हेतूने सदर सप्ताहानुसार शाळा स्तरावर पालक,शा.पो.आ. योजने अंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्यासाठी तृणधान्यावर आधारित पाककृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनात महिला पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. यामध्यें नाचणीची भाकर, भाजणीचे वडे, नाचणीचे गुलाबजाम, डाळ तांदूळ डोसा,रवा रवोबऱ्याचे मोदक, भजी, उकडीचे मोदक, शंकरपाळी, घावणं, इडली, भारंगीची रान भाजी, पुरी, रवा लाडू, शेवयाची खीर, गुलाबजाम, तांदळाची खीर, गाजर हलवा ,कोथिंबीर वडी इत्यादी पाककृतीत पदार्थांचा समावेश होता.मुलांच्या योग्य शारीरिक आणि मानसिक विकासासाठी बालवयात योग्य पोषण होण्यासाठी शालेय पोषण आहार योजने प्रमाणे आपापल्या घरी सुद्धा पालकांनी आहाराची व पाककृतीची काळजी घ्यावीच. गरोदर महिलांच्या कुटुंबात अधिक काळजी घेण्याची गरज अजून, अज्ञानी, उपलब्धतेचा अभाव व इतर कारणांनी कुपोषण समस्या दिसून येते. तरी आपण आहार व पोषण याबाबत जागरूकता ठेवावी .असे शाळेच्या मुख्याध्यापिका श्वेता खातू यांनी सुचित केले. या वेळी शा.व्य.समिती अध्यक्षा अर्चना किंजळकर, अंगणवाडी सेविका सविता पोमेंडकर,बशिक्षिका सारीका सांगळे, स्वयंपाकी प्राची पानवलकर, व इतर महिला पालक उपस्थित होत्या.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !