(चिपळूण)
भारत-चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी जागची रेकी करण्यासाठी गेलेले मोरेवणे गावचे सुपुत्र सुभेदार अजय शांताराम ढगळे हे देशसेवा करत असताना शहीद झाले. शहीद अजय ढगळे हे कारगील याआधी झालेल्या लढाईमध्ये टायगर हिल जिंकणाऱ्या जांबाज बहादुर टिममध्ये देखील होते. यावेळी शहीद अजय ढगळे यांना चिपळूण येथील त्यांच्या राहत्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने चिपळूण तालुक्यासह कोकणात शोककळा पसरली आहे.
भारत-चीन सीमेवर देशसेवा बजावताना शहीद झालेले सुभेदार अजय ढगळे यांना चिपळूण येथे त्यांच्या राहत्या ठिकाणी उपस्थित राहून रत्नागिरी -रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री ना.उदयजी सामंत यांनी मानवंदना दिली.
यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी पुजार, माजी आमदार सदानंद चव्हाण, आदीसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.