रत्नागिरी :
रत्नागिरी नगर परिषदेने शिवाजी नगर ते माळनाका दरम्यान दुभाजकावर व्यवसायिकांना बोर्ड लावण्याची परवानगी दिली आहे खरी पण हे पोल सुस्थितीत आहेत का? याकडे मात्र दुर्लक्ष केलंय.
🟫 मारुती मंदिर येथील लोटलीकर हॉस्पिटलसमोर लावण्यात आलेला बोर्ड कोसळण्याच्या स्थितीत आहे. हा पोल दुभाजकातुन पूर्णपणे निखळला असून कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. एखाद्या दुचाकीस्वरावर कोसळल्यास मोठा अपघात होऊ शकतो. हा अपघात झाल्यास नगर परिषद घेईल का जबाबदारी? आधीच रस्त्यांची लागलेली वाट आणि उडणारी धूळ याने जनता त्रस्त आहे. त्यात दुर्लक्षित केलेल्या अशा गोष्टीही जीवघेण्या ठरू शकतात. नागरिकांनी कोणत्या समस्येला तोंड द्यायचं याच कोडच उलगडत नाही. तर नगर परिषदेला मात्र याच काहीच पडलेलं दिसत नाही असे बोलले जात आहे.
🟫 नगर परिषदेने वेळीच पोल बदलावा आणि होणार अपघात टाळावा अशी मागणी वाहन चालकांतुन होत आहे.