(नवी दिल्ली)
चार दिवसापूर्वीच व्हॉट्सअॅप दोन तास बंद होते. करोडो लोकांना दोन तास म्हणजे अख्खं जग थांबल्यासारखं युजर्सना वाटत होत. त्यानंतर मात्र व्हॉट्सॲप चालू झालं. युजर्सना सुटकेचा निःश्वास टाकला. आता दोन दिवस उलटले नाहीत तोवर इंस्टाग्राम डाऊन झालं. सततच्या कारणांमुळे युजर्स मात्र वैतागले आहेत. त्यांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडिया प्लटफॉर्म फेसबुकचे फोलोअर्स अचानक कमी झाले होते. आता इन्स्टाग्रामचे अनेक युजर्स अकाउंट सस्पेंड झाल्याची तक्रार करत आहेत. काही युजर्स इन्स्टामध्ये लॉगइन करू शकत नसल्याने संतापले आहेत. अकाउंट सस्पेंड झाल्यामुळे अनेकजण नाराज झाले असून, ट्विटरवर याबाबत तक्रार करत आहेत. मात्र, नेहमीप्रमाणे यावेळीही फेसबुकने व्हॉट्सअॅप बंद करण्यामागचे खरे कारण सांगितले नाही.
सध्या ज्या युजर्सचे इन्स्टा प्रोफाइल सस्पेंड केले जात आहेत त्यांना कोणतेही कारण सांगितले गेलेले नाही. हे कंपनीकडून होत आहे की इन्स्टानं हॅक झालं आहे. त्यामुळे युजर्स मात्र गोंधळात आहेत. जेव्हा एखाद्या कंपनीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला होतो तेव्हाच सर्व्हर डाऊन होऊ शकते. कारण एकदा ट्विटरसोबत असे घडले होते. अनेक मोठी खाती हॅक झाली होती, नंतर असे आढळून आले की हॅकरने ट्विटरचा बॅकएंड ऍक्सेस घेतला होता.
इंस्टाग्रामच्या या मुद्द्यावर कंपनीने ट्विट करून कंपनी दुरुस्त करत असल्याचे सांगितले आहे. यावेळी देखील समस्या कुठे आहे आणि युजर्सची खाती स्वतःहून का सस्पेंड केली जात आहेत हे सांगण्यात आले नाही.
साधारणपणे, इंस्टाग्राम खाती निलंबित करण्यामागे एक कारण असते. कंपनीच्या कम्यूनिटी गाइडलाइन्सचं उल्लंघन केल्यास युजर्सची खाती निलंबित केली जातात. मात्र, सध्या काहीही न करता, अनेक वापरकर्त्यांची खाती निलंबित करण्यात आल्याने युजर्सही गोंधळले आहेत.