(नवी दिल्ली)
देशात ब-याच नागरिकांना व्हॉट्सअॅपवरून फ्रॉड कॉल्स येत आहेत. या कॉल्सच्या माध्यमातून अनेकजणांची फसवणूकही झाली आहे. यामुळे भारत सरकारने ही फसवणूक रोखण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. केंद्रीय दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या प्रकारच्या फसवणुकीला रोखण्यासाठी व्हॉट्सअॅप कंपनीच्या संपर्कात आहेत.
मेटाची मालकी असणा-या व्हॉट्सअॅपच्या अधिका-यांनी आपल्या मॅसेजिंग सर्व्हिसवरून या फ्रॉड मोबाईल क्रमांकाला डिरजिस्टर करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. या फ्रॉड कॉल्सवरून अनेकांची फसवणूक झाल्याचे आढळून आले आहे. यापूर्वीच अशा क्रमांकाच्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. ही माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांनी दिली. फ्रॉड कॉल्सना आळा घालण्यासाठी भारत सरकारने नेमकी कोणती कारवाई केली, असा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
मिंटच्या एका रिपोर्टनुसार या प्रकरणी भारत सरकारने नेमकी कोणती कारवाई केली आहे, असे केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी बैष्णव यांना प्रश्न विचारण्यात होता. यानंतर त्यांनी सांगितले की, व्हॉट्सअॅपच्या अधिका-यांनी आपल्या मॅसेजिंग सर्व्हिसवरून या फ्रॉड क्रमांकाला डिरसिस्टर करण्यासाठी सहमती दर्शविली आहे. पुढे ते म्हणाले की, भारत सरकारने फ्रॉड युजर्सना आळा घालण्यासाठी टेलिग्राम आणि इतर मॅसेजिंग प्लॅटफॉर्म सोबत चर्चा सुरू आहे.
काही दिवसापूर्वी बऱ्याच भारतीय व्हॉट्सअॅप युजर्सना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फ्रॉड कॉल्स येत होते. यामुळे युजर्सना त्रासही सहन करावा लागला होता. या फेक कॉल्सचा सुरूवातीचा क्रमांक +82 आणि +62 असा असून या क्रमांकावरून फोन केले जात होते.