(रत्नागिरी / वार्ताहर)
व्यायामशाळा मालक संस्था रत्नागिरी (जिम ओनर्स असोसिएशन, रत्नागिरी) या रत्नागिरी जिल्ह्यातील जिम मालक/संचालक यांची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २२ जानेवारी, २०२३ रोजी रत्नागिरीतील प्रसिद्ध व्यंकटेश हॉटेल, रत्नागिरी येथे पार पडली.
जिल्ह्यातील ही संस्था नोंदणीकृत असलेली महाराष्ट्रातील बहुदा एकमेव जिम ओनर्स असोसिएशन आहे. या संस्थेमध्ये एकूण (एकेचाळीस ४१) आजीव सभासद आहेत. श्रीकृष्ण (भाई) विलणकर (अध्यक्ष), संदीप (बावा) नाचणकर (उपाध्यक्ष), अमोल जाधव (सचिव), अमोल पवार (खजिनदार), वैभव कांबळे (कार्याध्यक्ष), नीता वारेकर (महिला प्रतिनिधी) असे पदाधिकारी आहेत.
उपस्थित सदस्य – संतोष कदम, शैलेश जाधव, किशोर पाटील, इरफान काद्री, सागर संसारे, हेमंत जाधव, अनिकेत पुसाळकर, महेश माने, दुष्यंत पाथरे, सदानंद बारटक्के, अभिजीत वाघधरे, मिलिंद कडवईकर, समीर साळवी, रझिन ठाकूर, भूषण शिंदे, महेश वादक, महेश मोहिते, सत्यजित सरसुभेदार, नितीश वारेकर, सत्यवान होरंबे, रोशन फगरे उपस्थित होते. संस्थेतील प्रत्येक जिम ओवनर्सना सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला.
या सभेत संस्थेची उद्दिष्टे ठरविण्यात आली. यामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन संघटना वाढवली पाहिजे, जिह्यातील नागरिकांमद्ये फिटनेस विषयी जागरूकता निर्माण करणे, व्यवसायाचा फायदा सर्वाना मिळावा यासाठी तालुका पातळीवर कार्यशाळा घेण्यात याव्यात, संस्थेच्या माध्यमातून नवीन सामाजिक उपक्रम राबवले जावेत, फिटनेस क्षेत्रातील संघटित खेळांच्या (बॉडी बिल्डींग, वेटलिफ्टींग, पॉवर लिफ्टींग, मेन फिजिक्स, मलखांब) जास्तीत जास्त स्पर्धा घ्याव्यात, राज्यस्तरीय स्पर्धेचे नियोजन करून जिल्ह्यातील खेळाडूंना संधी द्यावी, जिल्ह्यातील खेळाडूंच्या करिअरसाठी प्रोत्साहन द्यावे व त्यांना पाठिंबा द्यावा असे ठरविण्यात आले. तसेच संस्थेच्या विकासासाठी व कामासाठी निधी उभरण्यावर सर्वांचे एकमत झाले. त्यानुसार भविष्यातील नियोजन करून लवकरात लवकर प्रत्यक्ष अमंलबजावणी करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्याचे ठरविण्यात आले. शेवटी कार्यक्रमाचा समारोप व स्नेहभोजनाने सांगता करण्यात आली.