(चिपळूण)
व्यवसायात आपला हिस्सा किती, अशी विचारणा करणाऱ्या सख्ख्या भावाला दगड मारून त्याच्या पायावर गंभीर दुखापत केल्याची घटना खांदाट भोईवाडी (ता. चिपळूण) येथे २६ ऑगस्ट रोजी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दिनेश संपत पवार (३५) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सूरज पवार आणि त्यांचे दिनेश व हेमंत हे दोन भाऊ मिळून डांबर सप्लायर्सचा व्यवसाय करतात. त्यासाठी सूरज पवार यांनी कर्ज काढून तसेच साठवलेली रक्कम मिळून ८० लाख ५ हजार रुपये या व्यवसायासाठी दिले. त्यानंतर दिनेश याने पत्नी व स्वतःच्या नावे फर्म सुरू केली. सूरज पवार यानी या व्यवसायात आपला हिस्सा किती, अशी सातत्याने विचारणा केली. त्याचा राग येऊन दिनेश याने सूरज पवार यांना मारहाण केली.