(चिपळूण/प्रतिनिधी)
वैश्य समाज चिपळूण अंगीकृत वैश्य समाज युवक संघटना, वैश्य समाज महिला मंडळ आणि वैश्य समाज वधू वर सूचक मंडळ चिपळूण तर्फे दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी वैश्य भवन, राधाताई लाड सभागृह, चिपळूण येथे सकाळी 10 ते 12 या वेळेत भव्य भोंडला स्पर्धा आणि सायंकाळी 6 ते 8 या वेळेत दांडिया नाईट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
सदरील स्पर्धा ही चिपळूण मधील वैश्य समाज बांधवांसाठीच मर्यादीत आहे. ह्या स्पर्धांमध्ये भोंडला स्पर्धा ही एकच खुला गट असून सकाळी 10 ते 12 यावेळेत आयोजित करण्यात आली आहे. तर दांडिया नाईट्स स्पर्धा ही 3 गटांमध्ये घेतली जाणार आहे. त्यातील पहिला गट हा 0 ते 15 वय वर्ष लहान मुला-मुलींसाठी, दुसरा गट हा जोडीदार(कपल) साठी असून तिसरा गट हा सर्वांसाठी खुला गट असणार आहे. चारही स्पर्धा गटांमधील पहिल्या 3 स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
वैश्य समाजातील ज्या स्पर्धकांना यामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नावे श्री. रोहन चौधरी 9175412293, सौ. उमा जागुष्टे 9403627355, सौ. दिव्या रेडीज 8793300031, श्री. श्रीनाथ खेडेकर 9975147404, सौ. गीता चिंगळे 9975758340, श्री. अंकुश गांधी 9860194987 आणि सौ. नम्रता डाकवे 9175872142 यांचेकडे दिनांक 30 सप्टेंबर 2022 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत द्यावीत.
तरी जास्तीत जास्त वैश्य समाज मुला मुलींनी, बांधव व भगिनींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा तसेच सर्व समाज बांधवांनी ह्या उत्साहपूर्ण कार्यक्रमात सहभागी व्हावे व उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन वैश्य समाज युवक संघटना आणि वैश्य समाज महिला मंडळ यांचेतर्फे करण्यात आले आहे.