(पाटपन्हाळे / वार्ताहर )
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेला 9 सप्टेंबर 2023 रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने होणाऱ्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाला सारे माजी विद्यार्थी एकवटले आहेत. शाळेच्या भौतिक गरजांसाठी त्यांनी उत्स्फूर्त योगदान दिले आहे. अमृत महोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेआठ वाजता भव्य रॅली काढून होणार आहे .त्यानंतर अकरा वाजता माझी विद्यार्थी व शिक्षक यांचा गुणगौरव. व व शाळेबद्दलच्या आपल्या आठवणी शब्दबद्ध केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन ,जागा मालक तसेच शाळेसाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे त्यानंतर आजी व माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम दिमाखखगदारपणे संपन्न होणार आहे.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी यांनी केले आहे. मुख्य संयोजन समिती अध्यक्ष सानिया वनकर, सदस्य नारायण रोहीलकर, शंकर कोळथरकर, संदीप वनकर, दिलावर महालदार, सुदाम कोळथरकर मनोज पाटील ,स्वागत समिती.. अध्यक्ष सुदाम कोळथरकर, दशरथ नाटेकर ,संदीप वनकर ,शंकर कोळकर देवराम भोसले ,रामदास धोपावकर दुर्वास वनकर, विशाखा रोहीलकर अंजली मुद्दमवार, प्राजक्ता जांभरकर हर्षाली रोहीलकर, पूजा वनकर, रश्मी पटेकर ,सुरक्षा रोहीलकर सचिव मनोज पाटील, सांस्कृतिक कार्यक्रम समिती ..अध्यक्ष मारुती रोहीलकर, सदस्य सुदर्शन जांभारकर चंद्रकांत दाभोळकर, सानिका बेंदरकर, मनोज पावस्कर सूत्रसंचालक दशरथ वरवटकर, सुनिधी जांभरकर ,सोनाली खडपे, रॅली आयोजन समिती.. अध्यक्ष शैलेश रोहिलकर सदस्य नामदेव वनकर, निलेश दाभोळकर ,विशाखा रोही लकर ,रमेश रोहीलकर ,दीपक वरवटकर उलघना पाटील, स्मरणिका प्रकाशन.. समिती अध्यक्ष परीक्षित दाभोळकर सोनाली खडपे ,अंजली मुद्दमवार उलघना पाटील ,अंकिता कोळथरकर समन्वयक मनोज पाटील अशाप्रकारे कमिटी स्थापन करण्यात आलेले आहेत. तसेच उपस्थित सर्व माजी विद्यार्थी यांच्या जेवणाचा खर्च श्रीराम महिला मंडळ नवानगर रोहीलकरवाडी चहापानाचा खर्च विठ्ठलवाडी महिला मंडळ व वनकर वाडी महिला मंडळाच्या वतीने उपस्थितांना बुंदीचे लाडू याचा खर्च तर अध्यक्षा सानिया नाटेकर, पूजा वनकर सलोनी वनकर यांच्यातर्फे येणारा गुलाब पुष्पांचा खर्च करण्यात येणार आहे.
सर्व माजी विद्यार्थी शाळेच्या बौद्धिक गरजांची पूर्तता करण्यासाठी सज्ज झाले आहेत. शाळेच्या स्थापनेच्या दिवशी म्हणजे नव सप्टेंबर 1947 रोजी शाळेत दाखल असणारे माजी विद्यार्थी श्रीमती लीला चंद्रा वनकर ,श्री जनार्दन धाकट्या कोळथरकर, श्री रामा नारायण रोहीलकर यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात येणार आहे. शाळेला 75 वर्षे होत असल्याने 75 दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत ,75 रोप लावून जगविण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. शाळेला योगदान देणाऱ्या माजी शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बाल आनंद मेळावा तसेच वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा, रंगभरण स्पर्धा मनोरंजनात्मक गेम याचे आयोजन करण्यात येणार आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या अविस्मरणीय कार्यक्रमाला आपण सर्वांनी वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती श्रीराम ग्रामस्थ मंडळ, वनकर वाडी श्री गणेश ग्रामस्थ मंडळ ,श्री विठ्ठल रुक्माई ग्रामस्थ मंडळ, माजी विद्यार्थी संघाच्या वतीने करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी प्रयत्नशील आहेत.