( चिपळूण / प्रतिनिधी )
शहरातील मार्कंडी भागातील सेवानिवृत्त बालवाडी सेविका वीणा सुरेश कोवळे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७७ वर्षांच्या होत्या. निसर्ग, पर्यावरण, आणि सामाजिक क्षेत्रातील प्रसिद्ध कार्यकर्ते ‘पर्यटनदूत’ समीर कोवळे यांच्या त्या आई होत्या. आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ ‘दलितमित्र’ स्व. अनुताई वाघ (कोसबाड, जि. पालघर) यांच्या त्या अनुयायी विद्यार्थीनी होत्या. वीणा कोवळे यांनी चिपळूण नगर परिषद पुरस्कृत शहरातील विविध ठिकाणच्या बालवाड्यांवर ‘सेविका’ म्हणून अनेक वर्षे सेवा केली होती. त्या आदर्श बालवाडी सेविका म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांच्या कार्यकाळात बालवाडीत शिकलेले अनेक विद्यार्थी आज समाजात प्रतिष्ठित जीवन जगत आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या दसपिंड विधी ८ एप्रिलला (शनिवार) रामतीर्थ स्मशानभूमी येथे तर बारावे-तेरावे १०-११ एप्रिलला मार्कंडी येथील निवासस्थानी होणार आहे.