(रत्नागिरी)
अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केलेल्या प्रौढाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात शुक्रवार २३ जून रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या मृत्यू झाला.
संदीप नारायण पावसकर (५३, रा. वाडेकरवाडी नाचणे, रत्नागिरी ) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. संदीप पावसकर यांनी अज्ञात कारणातून मंगळवार दि. २० जून रोजी राहत्या घरी आंबा फवारणीचे औषध प्राशन केले होते, असे सांगण्यात आले.
काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारांदरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.