(जाकादेवी / किशोर पवार)
जागतिक विश्व विद्यापीठांनी विविध पदव्या देऊन विभूषित केलेले भारतीय जनसामान्यातील महामानव, बोधिसत्व, विश्वरत्न, प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जयंती महोत्सव शुक्रवार दि. १४ एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबाद प्रमाणे सदरचा कार्यक्रम बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरी व भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वा.तथागत भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची शहरातून चित्ररथ व मोटार बाईकसह धम्म रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मारुती मंदिर येथून सुरुवात होणार आहे.
सकाळी १०.४५ वा. ध्वजारोहण, पुष्पहार अर्पण, समता सैनिक दलाची मानवंदना, रत्नागिरी बटालियन व सामुदायिक बुद्ध वंदना स्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रत्नागिरी येथे दु. १२.३० वाजता, ०१.४५ वाजता शिक्षकांचा बुद्ध-भीम गीतांचा वाद्यवृंद कार्यक्रम.
दु. २ ते ४ या वेळेत विशेष धम्म मेळावा बुद्ध विहार बुद्ध मूर्ती, आंबेडकर वाडी, डीएसपी बंगलानजिक रत्नागिरी येथे इतिहास संशोधन पुणे येथील प्रसिद्ध प्राध्या. बालाजी गाडेपाटील यांचे सर्वव्यापी डॉ.बाबासाहेब आंबेडकर या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
तरी रत्नागिरी तालुक्यातील तमाम बंधू भगिनींनी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त जयंती उत्सव समितीचे उपक्रमशील अध्यक्ष आयु. प्रकाश रामचंद्र पवार, उपाध्यक्ष तुषार जाधव, सचिव विजय मोहिते, सहसचिव सुहास कांबळे, कोषाध्यक्ष नरेंद्र आयरे यांनी केले आहे.