(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत विल्ये या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या थेट निवडणुकीमध्ये गावात झालेल्या एकूण ३०९ मतांपैकी २१५ मते घेऊन स्वप्निल संजय देसाई सरपंचपदावर निवडून आले आहेत.
विल्ये ग्रामपंचायतीत एकूण ३०९ झालेल्या मतदान पैकी २१४ अशी भरघोस मते घेऊन विल्ये गावचे युवकांचे प्रेरणास्थान तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल संजय देसाई हे निवडून आल्याने त्यांचे विल्ये गावात जंगी स्वागत करण्यात आले. विल्ये ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी निवडणुकीला गावातून उभे राहिलेले माजी सरपंच सुवेज सिताराम कांबळे यांना ९४ मते मिळाली तर स्वप्निल देसाई यांना २१५ मते मिळाली.
स्वप्नील देसाई यांचे नेतृत्व मान्य करत मतदारांनी नव्या उमेदीने उभ्या राहिलेल्या स्वप्निल देसाई यांना भरघोस मतांनी विजय प्राप्त करून दिला आहे. स्वप्निल देसाई हे युवा नेते असून सामाजिक बांधिलकीतून ते अनेकांना मदतीचा हात देत आलेले आहेत, एक कणखर आणि अनेकांना मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून स्वप्निल देसाई यांच्याकडे पाहिले जाते.त्यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात रस आहे.
सरपंचाच्या कारकीर्दीत गावात विकास कामांना प्राधान्य दिले जाईल असा आत्मविश्वास व्यक्त करत मतदारांनी दाखवलेला विश्वास आपण सार्थ ठरवू, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच स्वप्निल देसाई यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. स्वप्नील देसाई सरपंच पदी निवडून आल्याने त्यांचे गावातून अभिनंदन होत आहे.