(देवरुख/ सुरेश सप्रे)
देवरूख मधील कांजिवरा भागातील युवकांचे आयकाँन जनसामान्यांना न्याय देणारे व संगमेश्वर तालुक्याचे विद्यार्थी सेनेचे माजी अध्यक्ष प्रल्हाद तथा पपू गायकवाड यांनी रविवारी उद्योजक किरण सामंत यांचे उपस्थित आपल्या प्रमुख समर्थकांसह बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत( शिंदे गट) प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे उ. भा. ठा. सेनेला चांगलाच दणका मिळाल्याचे मानले जात आहे.
यापुर्वी तालुका प्रमुख प्रमोद पवार यांनी आपल्या सहकार्यासह नाम. उदय सामंत याचे उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता गायकवाड यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर प्रल्हाद (पपू) गायकवाड यांची त्वरीत देवरूख शहराच्या अध्यक्ष पदी निवड जाहीर करणेत आल्याने उबाठा सेनेत चलबिचल सुरू झाली आहे. मी विचारपुर्व शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता देवरूख शहरासह तालुक्यात जनसामान्यांना न्याय देत सर्वांना बरोबर घेत संघटना वाढीसाठी एकत्र करीन अशी ग्वाही गायकवाड यांनी प्रवेशानंतर बोलताना दिली.