(राजापूर)
राजापूर तालुका वारकरी सांप्रादाय यांच्यावतीने पाचल येथे माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने हरिनाम सप्ताहाचा आयोजन श्री महागणपती मंदिर पाचल येथे नुकतेच करण्यात आले होते.याला संपूर्ण तालुक्यातील वारकऱ्यांनी उपस्थित राहून हा सोहळा उत्तम रित्या पार पडला. पांडुरंगाचे नामस्मरण गावोंगावी पोहोचवण्यासाठी आणि वारकरी सांप्रदाय एकत्र करण्यासाठी हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.
या भागातील तसेच पंचक्रोशीतील जवळजवळ चाळीस गावातील वारकरी या सप्ताहात सहभागी होतात. प्रवचन, हरिपाठ, महाप्रसाद व इतर कार्यक्रमाचे आयोजन या वेळी केले जाते. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील वारकरी मोठ्या भक्ती भावाने उपस्थित राहून हरिपाठ करतात, कीर्तन करतात. भजनात अगदी तल्लीन होऊन निस्वार्थी सेवा करीत असतात.
श्री महागणपती उत्सव मंडळाने आम्हाला गेली सात वर्ष गणपती मंदिर व मंदिराचा परिसर हरिनाम सप्ताहासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानताना लवकरच असे उपक्रम आम्ही राजापूर तालुक्यातील प्रत्येक गावागावात करणार असल्याची माहिती राजापूर तालुका वारकरी सांप्रदाय चे अध्यक्ष शंकर उर्फ आण्णा पाथरे यांनी यावेळी दिली.
तसेच लवकरच आम्ही हे जाहीर करणार असल्याचेही ते म्हणाले. कार्याध्यक्ष -संतोष चव्हाण,उपाध्यक्ष- दौलतराव पाटेकर, पुंडलिक बुवा, पाटेकर,सेक्रेटरी- शांताराम रोगे, खजिनदार- बेर्डे, भास्कर सुतार, गिरीश सक्रे, पांडुरंग नारकर, प्रभाकर पाथरे, भाई ताम्हणकर, तेलंग कुटुंब, तसेच राजकीय, सामाजिक लोकांचा या उपक्रमात मोठा सहभाग असल्याने या उपक्रमाला संपूर्ण राजापूर तालुक्यात वर्षानुवर्षे चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहितीही अध्यक्ष आण्णा पाथरे यांनी दिली.