( देवरूख /सुरेश सप्रे )
सार्वजनिक ठिकाणी महिलांबद्दल बेजबाबदार वक्तव्य करून सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी काल महिलांनी ठीय्या धरलेवर गुन्हा दाखल झालेले देवरूखचे एस.टी. आगाराचे प्रमुख सागर गाडे यांची चौकशी करून कारवाई न करता आज राजापूरला बदली करून त्यांना वाचविणेचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. गाडे आज तातडीने राजापूरला हजर झाले आहेत.
एसटी महामंडळाकडून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांची बदली करण्यात आल्याने सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान सागर गाडेंना आता राजापूरमधूनही विरोध होण्याची शक्यता आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या देवरूख आगाराचे प्रमुख सागर गाडे यांनी गेल्या महिन्यात सार्वजनिक ठिकाणी विविध समाजाविषयी आणि महिलांविषयी अश्लिल व प्रक्षोभक टिपण्णी केली होती. याचा सबळ पुरावा हाती मिळताच संगमेश्वर तालुका भाजपच्या वतीने याविरोधात देवरूख पोलिस ठाण्यात निवेदन देत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
त्याआधी देवरूखातील सर्वपक्षीय महिलांनीही असेच निवेदन देत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र त्याला 15 दिवस उलटून गेले तरी कोणतीही कारवाई झाली नव्हती. अखेर काल सकाळी संगमेश्वर तालुका भाजप पदाधिकारी व सर्व पक्षिय महीलांनी देवरूख पोलिस ठाण्यात धडक देण्यात आली. यानंतर महिलांसह पुरुषांनी भर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. याला यश येत भाजप संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी पोलिसांच्या मागणीवरून रितसर तक्रार दाखल केल्यानंतर सागर गाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गाडेंवर महामंडळानेही रितसर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन संगमेश्वर तालुका भाजपने विभाग नियंत्रक रत्नागिरी यांना सादर केले होते, मात्र कारवाई ऐवजी गाडेंची राजापूर येथे बदली झाल्याने सर्व पक्षिय महिलांसह भाजपात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आधीच या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद होती. त्यामुळेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास वेळ झाला होता. नंतर फक्त चॅप्टर केस दाखल करत. कोर्टात जाणणेचा सल्ला दिला. त्यावर आता महामंडळानेही आमच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार असून काहीही करून गाडेंसारखी माणसे असा सार्वजनिक सेवेत नकोत हे आमचे म्हणणे आहे.
प्रमोद अधटराव,
तालुकाध्यक्ष, भाजप , संगमेश्वर