( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवकुमार फासके यांना मारहाण केल्याप्रकरणी फारूक जहांगीर लसकर ( मालाड पूर्व मुंबई) याला न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, डॉक्टर फासके हे बावनदी मार्गे देवरूखला जात असताना फारूक लसकर याला चारचाकी गाडीतून लिफ्ट दिली होती. बावनदी येथे चहा घेण्यासाठी टपरीजवळ थांबले असता चहा पीत असतानाच डॉ. फासके यांच्या चारचाकी गाडीची चावी त्याने मागितली. डॉक्टरांनी चावी कशाकरता हवी आहे असे विचारले असता त्या तरुणाने डॉक्टरांना मारहाण जबर मारहाण केली होती. ही घटना सोमवार 12 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली होती. लसकर याने दगडाने मारहाण करून डॉक्टर शिवकुमार फासके याना गंभीर जखमी केले. फासके याना कोल्हापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे.
फासके याना मारहाण करणाऱ्या लसकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मंगळवारी त्याला देवरूख येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.