(संगमेश्वर/प्रतिनिधी)
पुरामुळे वांद्री-उक्षी येथील घरांमध्ये पाणी घुसून मोठया प्रमाणात नुकसान होते. तसेच शेतीचे नुकसान होत असल्यामुळे वांद्री-उक्षी ग्रामस्थांनी बावनदीतील गाळ उपसा करावा यासाठी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे आपले म्हणणे मांडले होते. वारंवार पाठपुरावा केला होता. या मागणीचा विचार करुन राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी याकरीता निधी मंजूर केला. तसेच जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनीही यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आज 15 एप्रिल पासून बावनदीतील गाळ उपशाला जेसीबीच्या सहाय्याने सुरुवात करण्यात आली. नदीतील गाळ उपसा होत असल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे