(राजापूर)
राजापूर तालुक्यातील गोवळ चौकटवाडी येथील वहाळात ठाण मांडून बसलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. सुमारे 24 तासाहून अधिक चाललेल्या या रेस्क्यु आपरेशनमध्ये वनविभागाचा चांगलाच कस लागला होता. अखेर गुरूवारी सकाळी बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेतल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला.
गोवळ चौकटवाडी येथील शिमगोत्सवाच्या मांडालगत असलेल्या वहाळात बुधवारी सकाळी बिबट्या बसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. बराचवेळ बिबट्या जागेवरून हलत नसल्याने ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्प साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर राजापूर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या अशक्त बनल्याने त्याला पळता येत नव्हते. त्यामुळे त्याला पिंजऱयात पकडण्याचा पयत्न वनविभागाकडून सुरू होता. मात्र वनविभागाचे अधिकारी जवळ गेल्यानंतर बिबट्या त्यांच्यावर हल्ला करत असल्याने बिबट्याला पिंजऱयात जेरबंद करणे जिकरीचे बनले होते.
बुधवारी सकाळपासून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्याला पकडण्याचा पयत्न करत होते. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांना बिबट्याला पकडण्यात यश आले नव्हते. अखेर गुरूवारी सकाळी बिबट्या वहाळातील मोठ्या दगडांच्या कपारीत जाऊन बसला. त्यानंतर वनविभागाने वहाळात पिंजरा लावून सर्व बाजूंनी मोठी जाळी लावली. त्यानंतर गुरूवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बिबट्याला पिंजऱयात जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱयांना यश आले. बिबट्याला पिंजऱयात पकडल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
सुमारे चोवीस तासाहून अधिक काळ चाललेल्या या मोहीमेत वन विभागाच्या अधिकाऱयांचा चांगलाच कस लागलेला पहायला मिळाला. तर भर वस्तीलगत असलेल्या वहाळात बिबट्या ठाण मांडून बसल्याने ग्रामस्थांचीही पाचावर धारण बसली होती. मात्र बिबट्याला पिंजऱयात जेरबंद केल्यानंतर ग्रामस्थांसह वन विभागाच्या अधिकाऱयांनीही सुटकेचा श्वास घेतला.
या मोहीमध्ये रत्नागिरी वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक सुरज तेली, विजय म्हादये, दिपक म्हादये, पथमेश म्हादये, दिपक चव्हाण, लांजा वनपाल श्री.आरेकर, वनरक्षक विकम पुंभार, देवरूख वनपाल तौफीक मुल्ला, श्री.माळी, श्री.साबणे यांनी मोलीची भूमिका बजावली. गोवळ ग्रामस्थांनीही या मोहीमेमध्ये वनविभागाला सहकार्य केले.