(नवी दिल्ली)
भारतात होणार्या वनडे वर्ल्ड कपला अवघे काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपची सुरुवात ही इंग्लंड आणि न्यूझीलंड या गतविजेत्या आणि उपविजेत्या संघातील सामन्याने होणार आहे. हा सामना अहमदाबाबदच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून याच स्टेडियमवर वर्ल्ड कपचा ग्रँड उद्घाटन सोहळा देखील होणार आहे, मात्र हा उद्घाटन सोहळा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या सामन्यापूर्वी होणार नसून तो आदल्या दिवशी म्हणजे 4 ऑक्टोबरला संध्याकाळी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्याचवेळी आयसीसी कॅप्टन्स डे देखील आहे.
वर्ल्ड कपचे सर्व सराव सामने हे 3 ऑक्टोबरला संपणार आहेत. त्यानंतर सर्व कर्णधार अहमदाबादमध्ये दाखल होतील. हा एक ग्रँड उद्घाटन सोहळा असणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा 4 ऑक्टोबरला थिरुवअनंतपुरमवरून अहमदाबादमध्ये सकाळी दाखल होईल. यापूर्वी भारत नेदरलँडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. आयसीसी आणि बीसीसीआयने वर्ल्ड कपच्या उद्घाटन सोहळ्याची रूपरेषा कशी असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.