(दापोली)
वराडकर- बेलोसे महाविद्यालयात एकूण 33 वर्षे भूगोलाचे अध्यापन करून प्रा.नंदकुमार गारडे मंगळवारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. सेवापूर्ती निमित्ताने भूगोल विभागातर्फे आयोजित निरोप समारंभात माजी विद्यार्थी, बुकटो स्थानिक संघटनेचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी NSS, SPORTS, IQAC Coordinator च्या माध्यमातून केलेल्या सेवेचा गौरवपूर्ण लेखाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुरेश निंबाळकर, प्रा.उत्तम पाटील, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक
श्री. विश्वंभर कमळकर, उप-प्राचार्य प्रा.डी. आर. कोळी यांनी केला.
यावेळी ओंकार गोंदकर, प्रसाद गुजर, शामसुंदर डिके, दिपेश लखमदे, अॅड. अक्षय जाधव, प्रशांत काळे, वैभव येलवे, शैलेश सावंत, श्री.शैलेश आठल्ये, रेश्मा भांबीड, शिवाजी साबळे, संकेत मेहता, श्रीकांत पवार या माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली व सरांच्या शिकविण्याच्या पद्धतीचा अभ्यासात, नोकरी व व्यवसायासाठी उपयोग झाल्याचे सांगितले. तर अभिजित पतंगे यांनी भेटवस्तू पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रा.नंदकुमार गारडे यांनी यावेळी विद्यार्थी हेच माझे सर्वस्व असल्यामुळे त्यांना पोटच्या पोराप्रमाणे वागविले व शिकविले असे सांगितले. आर्मी, शेतकरी व शिक्षक असे त्यांचे करियर विषयी स्वप्न होते. त्यातील शिक्षक होण्याची प्रेरणा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचेकडून घेतल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांकडून झालेला सत्कार अधिक मोलाचा असुन त्यामुळे मला खूप आनंद झाला असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ भारत कऱ्हाड यांनी प्रा. गारडे यांना आर्थिक, कौटुंबिक व आरोग्य स्वास्थ्य लाभो व त्यांच्याकडून उर्वरित आयुष्यात विद्यार्थ्यांना असेच मार्गदर्शन मिळत राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली. कु.निमिषा रघुवीर हिने सूत्रसंचालन केले. प्रा.स्कंधा खेडेकर यांनी प्रास्तविक केले तर कु.समीर पवार याने आभार मानले.