(वैभव पवार / गणपतीपुळे)
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गावतील खारवी बांधवांनी बुधवारी पाग पंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली. वरवडे गावतील खारवी बांधव परंपरागत चालत आलेली पाग पंचमी दरवर्षी आनंदात साजरी करतात.श्रावणातील सप्ताह उठल्या नंतर ही पाग पंचमी साजरी केली जाते.
देवी सोमजाई व बंदरकरी बाबा यांना गाऱ्हाणे घालून नैवेद्याची परडी भरली जाते.दोन मानाचे पागी व एक विल्हेवाला यांच्या सोबत परडी वाजत गाजत समुद्र वर नेली जाते.बोटीत बसून सर्व खारवी बांधव परडी घेऊन समुद्रात जातात व परडी सोडून मानाचे पाग टाकले जातात त्या पागात जी मासली भेटेल तिचा प्रसाद केला जातो.या पाग पंचमीला सर्व खारवी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असते.अशा पद्धतीने पाग पंचमी अतिशय उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.