(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 18 वरची निवेंडी भीमनगर चे विद्यमान अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पांडुरंग कदम यांच्या पत्नी चंद्रप्रभा चंद्रकांत कदम यांचे २७ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या.
कालकथित चंद्रप्रभा कदम या अतिशय प्रेमळ, हसतमुख व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्या वरची निवेंडी भीमनगर येथील बौद्धजन पंचायत समितीच्या अखत्यारीत असलेल्या माता रमाई आदर्श महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा आणि विद्यमान हिशोब तपासणीस म्हणून कार्यरत होत्या.वरची निवेंडी भीमनगर येथील प्रत्येक धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे.तसेच लहान थोरांशी आदराने वागणे आणि मानसन्मान देणे हे त्यांच्या स्वभावाचे विशेष गुण होते. त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण वरची निवेंडी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली, जावई असा परिवार आहे.कालकथित चंद्रप्रभा कदम यांचा जलदानविधी तथा पुण्यानुमोदन कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी रविवार दिनांक 5 नोव्हेंबर २०२३रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांचे कुटुंबीय आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १८ वरची निवेंडी भीमनगर गावशाखेच्या वतीने करण्यात आले आहे.