(रत्नागिरी)
तालुक्यातील जाकादेवी येथे वकीलाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आह़े. रवींद्र केशव लेंडे (31, ऱा जाकादेवी रत्नागिरी) असे या वकिलाचे नाव आह़े. या प्रकरणी वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी चौघा संशयितांविरूद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रतिक सुधीर देसाई, सुधीर देसाई, बंड्या देसाई व दत्ता देसाई (ऱा. जाकादेवी रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मार्च 2023 रोजी जाकादेवी येथे वकील रवींद्र लेंडे व त्यांची पत्नी यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला होत़ा. यावेळी संशयित आरोपी यंनी घरात शिरून रवींद्र लेंडे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केल़ी तसेच जातीवाचक शिवीगाळ केली, असे रवींद्र यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आह़े. तसेच रवींद्र हे घरातून न्यायालयात जाण्यासाठी निघाले असता त्यांच्या गाडीभोवती चिरे लावण्यात आल्याचे दिसून आल़े. या बाबत रवींद्र याने आपल्या आईजवळ सांगितले असता संशयित आरोपी यांनी आम्हाला तुमच्या मुलाला ठार मारावयाचे आह़े. जाकादेवीत राहण्याची तुमची लायकी नाह़ी, तुला रॉकेल टाकून पेटवून देवू, अशी धमकी देत अश्लिल शिवीगाळ व जातीवाचक शिवीगाळ केल्याचे लेंडे यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आह़े.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी यांच्याविरूद्ध भादंवि कलम 323,504,506 सह 34 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या 3 (1) (आर) (एस)(झेड) व 3 (2) (व्हीए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा आहे.