(रत्नागिरी)
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांचेवतीने दिनांक सात व आठ ऑक्टोबर 2023 कालावधी राज्यस्तरीय पंच/ रेफ्री व रिफ्रेशर सेमिनारचे आयोजन तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई व रायगड जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या वतीने खंडाळा (लोणावळा) येथे आयोजन करण्यात आले आहे. या पंच सेमिनार मध्ये उत्तीर्ण झालेल्या पंचांना आगामी शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन नियमासह पंच/रेफ्री काम करण्याकरिता संधी लाभणार आहे.
सदर पंच सेमिनार करिता रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन व नेहरू युवा केंद्र रत्नागिरी (भारत सरकार संलग्न) युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर साळवी स्टॉप नाचणे रत्नागिरी या प्रशिक्षण वर्गातील तीन ब्लॅक बेल्ट प्रशिक्षक अमित जाधव , प्रतीक पवार, मुक्ती कांबळे यांची निवड झाली आहे. सदर प्रशिक्षकांना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष श्री वेंकटेश्वरराव कररा, सचिव लक्ष्मण कररा, युवा मास्टर तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरचे मुख्य प्रशिक्षक राम कररा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.