(रत्नागिरी)
श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी पेजे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शिवार आंबेरे अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गावखडी समुद्र किनारा येथे सागरीतट स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये 60 विद्यार्थी व चार प्राध्यापक सहभागी झाले होते.
या मोहिमेत गावखडी ग्रामपंचायतिचे सरपंच श्री मुरलीधर भिकाजी तोडणकर, ग्रामपंचायत सदस्य पूर्वा प्रकाश पाटील तसेच स्मिता ज्ञानदेव भिवंदे, सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष सन्मुख तोडणकर, गावखडी ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी श्री सुरेश गोपाळ मोहिरे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री प्रमोद धोंडू पाटील, जीवरक्षक श्री राकेश सदानंद पाटील यांनी या मोहिमेसाठी विद्यार्थ्यांना मौलिक असे सहकार्य केले प्रत्यक्ष येऊन मोहिमेत सहभाग घेतला. ग्रामविकास अधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे संस्थेचे व प्राध्यापकांचे आभार व्यक्त केले.
प्राध्यापिका कल्पना मेस्त्री, कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे तसेच सहकार्य केलेल्या ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच या सर्वांचे आभार व्यक्त करून मोहीम संपन्न झाली असे जाहीर केले. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी संस्थाध्यक्ष श्री नंदकुमार मोहिते, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. राकेश आंबेकर, संस्थेचे सचिव श्री मधुकर थुळ यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. या मोहिमेत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग प्रमुख प्रा. रोशन चव्हाण, प्रा. अमित पवार, प्रा. अनुष्का लिंगायत व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी कल्पना मेस्त्री यांनी प्रत्यक्ष सहभाग दर्शविला