(रत्नागिरी)
लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल आयोजित, झरेवाडी गावरान मसाला आणि कळंबटे फूड फार्म पुरस्कृत, रत्नागिरी तालुकास्तरीय तृणधान्यांची (नाचणी) पाककला स्पर्धा हातखंबा ग्रामपंचायत सभागृह येथे संपन्न झाली. या स्पर्धेला रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेमध्ये सुलभा फणसळकर यांचे नाचणीचे स्प्रिंग रोल ही पाककृती प्रथम ठरली तर दीक्षा कळंबटे (नाचणी पौष्टिक मोदक) द्वितीय, वैशाली देवदास (नाचणी मिसळ पाव) तृतीय, श्रुती बने (नाचणी चाट) उत्तेजनार्थ, साक्षी पाटील (नाचणी पौष्टिक रबडी) उत्तेजनार्थ ठरल्या. तर नाचणी पासून बनविलेल्या मोमोज, गुलाबजामुन, चटपटी चाट, कटलेट, बर्फी, पातोळे,केक खाकरा, पास्ता, अनारसे, ढोकळा शिरवाळे, थाळीपीठ असे अनेक पदार्थ लक्षवेधी ठरले. खवय्यांनी या सर्व पदार्थांची चव चाखण्याचा मनमुराद आनंद घेतला. या स्पर्धेचे परीक्षण शेफ मेघना शेलार व श्री. ताराचंद ढोबाळे यांनी केले. सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवर म्हणून रत्नागिरी झोन चेअरमन श्रेया केळकर प्राध्यापक चंद्रमोहन देसाई सर, श्रीपाद केळकर यांची उपस्थिती लाभली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री सुनील दत्त देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष मनोज कुमार खानविलकर आणि संपूर्ण टीमने मेहनत घेतली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला.गौरी सावेकर, ला.सचिन सावेकर व ला.मनस्वी जाधव यांनी केले, तर आभार ला. अवधूत कळंबटे यांनी मानले