(नवी दिल्ली)
महिलांसाठी भारतीय रेल्वेने चांगली घोषणा केली आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाडीमध्ये बोगीमध्ये महिलांसाठी सहा जागा यापुढे राखीव ठेवण्यात येणार असल्याची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनमध्ये स्लीपर क्लास कोचमध्ये ६ बर्थ महिलांसाठी राखीव असतील. गरीब रथ, राजधानी, दुरंतोसह वातानुकूलित एक्स्प्रेस ट्रेनच्या थर्ड एसी कोचमध्ये महिला प्रवाशांसाठी सहा बर्थ राखीव असतील.
याशिवाय रेल्वेत महिला प्रवाशांना आणखी काही सुविधाही मिळणार आहेत. रेल्वेच्या या निर्णायामुळे महिलांना तिकिट आरक्षित करताना फायदा होणार आहे. त्याशिवाय इतर सुविधांमुळे प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. महिलांसाठी काही बर्थ आरक्षित करण्याच्या निर्णयासोबतच महिलांच्या सुरक्षेसाठी खास प्लॅनही तयार करण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये महिलांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी, भारतीय रेल्वेने बर्थ रिझर्व्ह करण्यासोबत आणखी सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी खास उपाय योजना करण्यात येणार आहेत.