(लांजा)
लांजा तालुक्यातील मौजे साटवली बाजारपेठेत बुधवारी (दिनांक २८ जून २०२३ ) सायंकाळच्या सुमारास विनापरवाना विदेशी दारू विक्री करताना आढळून आला. या प्रकरणी एका विरोधात लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन शंकर कस्तुर (वय ४७) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी लांजा पोलिस साटवली बाजारपेठेत गस्त घालत असताना त्यांना हॉटेलच्या मागे आडोशाला सचिन कस्तुर हा विदेशी दारुच्या एकूण १ हजार ९२५ रुपयांच्या १५ दारुच्या बाटल्या विक्रीसाठी आणल्याचे निदर्शनात आले. त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी त्याच्यावर महाराष्ट्र दारू अधिनियम कायदा ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.