( लांजा / विशेष प्रतिनिधी )
मुंबई – गोवा महामार्गावरील लांजा वेरळ येथे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कंटेनर (MH- 43, BB – 9234) पलटी झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. हा कंटेनर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. वेरळ घाटातील अवघड वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कंटेनर पूर्णपणे कलंडला. यामध्ये कंटेनर चालक जखमी झाला आहे. तर कंटेनरचे रॉड तुटले आहेत. या अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. या कंटेनरचे वैशिष्ठ्य म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे रविवार 3 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता अपघात झाला होता यावेळी हा कंटेनर मच्छी घेऊन जात होता कंटेनर पलटी झाल्यानंतर या ठिकाणचे वाहतूक चार तास ठप्प होती त्यावेळी जवळपास सकाळी दहा वाजता कोसळलेल्या कंटेनर काढण्यासाठी दुपारी दोन वाजले होते दोन क्रेनच्या सहाय्याने या कंटेनरला जवळपास पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाजूला करण्यात यश आले होते. नंतर आता 26 ऑगस्ट रोजी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातामुळे जवळपास 2-3 किलोमिटर पर्यंत या रांगा लागलेल्या आहेत.
गणेशोत्सवनिमित्त गावाला आलेल्या चाकरमान्यांचा यामुळे खोळंबा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी कंटेनर चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही वाहतुकीचा खोळंबा झाला असून पोलिस वाहतूक सुरळीत करण्यासाठी झटत आहेत.