(लांजा/प्रतिनिधी)
सध्या राज्यात राजकीय घडामोडी घडत आहेत. यामध्ये शिवसेनेचे काही आमदार शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतानाच लांजा- राजापूर-साखरपा विधानसभेचे आमदार राजन साळवी यांनी आपण शिवसेनेसोबतच व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे जाहीर केले होते. आपण कट्टर शिवसैनिक आहोत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे कट्टर शिवसैनिक असलेल्या आमदार राजन साळवी यांचे लांजा तालुका शिवसेना व युवासेना यांच्यावतीने रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले.